
डॉ. निवेदिता गुप्ता यांनी म्हटले की, एप्रिल २०२४ पासून डेंग्यू व्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू होईल. ट्रायलसाठी आमच्याकडे १८ ते ८० वर्ष वयाच्या १० हजाराहून अधिक लोक उपलब्ध आहेत. सर्वांना २० वेगवेगळ्या स्थानांवर अभ्यासासाठी नेले जाईल. पहिल्या टप्प्यातील व्हॅक्सीनची सुरक्षेती तपासणी केली जाईल.








