धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध अनुयायांसाठी टोल माफीची मागणी

0
18
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध अनुयायांसाठी टोल माफीची मागणी

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन

मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी नागपूरच्या दीक्षाभूमीकडे प्रवास करणार आहेत. तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी १ ते ४ ऑक्टोबरदरम्यान राज्यभरातून बौद्ध बांधव प्रवास करतात. या पार्श्वभूमीवर बौद्ध अनुयायांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कालावधीत राज्यातील सर्व टोल नाके बौद्ध प्रवाशांसाठी माफ करावेत, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

आंबेडकर यांनी सांगितले की, “धम्मचक्र प्रवर्तन दिन हा समतेचा, मानवतेचा आणि परिवर्तनाचा उत्सव आहे. राज्यभरातून हजारो वाहनांतून अनुयायी नागपूरकडे प्रस्थान करतात. या प्रवासादरम्यान टोलमाफी मिळाल्यास बौद्ध बांधवांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.”

यावेळी त्यांनी आशा व्यक्त केली की मुख्यमंत्री फडणवीस या मागणीचा सकारात्मक विचार करतील आणि टोलमाफीची घोषणा करतील.