
दिल्ली सरकारच्या मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बोलवले आहे. मात्र, या चौकशीला केजरीवाल हजर राहण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते.
नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी चौकशी करण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना बोलवले आहे. मात्र, या चौकशीला केजरीवाल हजर राहण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते. ईडीची नोटीस बेकायदा असल्याचा दावा आम आदमी पक्षाने (आप) केला आहे, तर मुख्यमंत्री चौकशीपासून पळ का काढत आहेत, असा सवाल भाजपने केला आहे.
गेल्या एप्रिल महिन्यात पहिल्यांदा केजरीवाल यांची चौकशी झाली होती. त्यावेळी जवळपास आठ तास ईडीने केजरीवाल यांची चौकशी केली होती. त्यानंतर गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून त्यांना ईडी नोटीस पाठवित आहे. परंतु प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे सांगून मुख्यमंत्री केजरीवाल ईडीसमोर जाण्याचे टाळत आहेत.









