
नेमके काय झाले ?
स्पाइसजेटचे एसजी १२३ हे विमान आज सकाळी १०.३० वाजता दिल्ली विमानतळावरून लेह येथे जाण्यासाठी उडाले. काही वेळ हे विमान उडाले. दरम्यान विमान हवेत असतांना अचानक मोठी कंपने विमानात जाणवू लागली. यामुले प्रवाशांची घबराट उडाली. अनेक प्रवासी घाबरून ओरडू लागल्याची देखील माहिती आहे. दरम्यान, ही बाब वैमानिकाने दिल्ली विमानतळाला दिली. वैमानिकाने हे विमान पुन्हा माघारी फिरवून दिल्ली विमानतळाकडे वळवले. दिल्ली विमानतळावर आणीबाणी लागू करून या विमानाचे आपत्कालीन लॅंडींग करण्यात आले. तब्बल १३५ प्रवासी या विमानात होते. विमानाचे लॅंडींग होई पर्यन्त प्रवासी चिंतातुर होते.







