Deepika Padukone: मुलीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण घेणार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय? ऐकून चाहत्यांना बसेल धक्का!

0
16
Deepika Padukone: मुलीच्या जन्मानंतर दीपिका पादुकोण घेणार ‘हा’ महत्त्वाचा निर्णय? ऐकून चाहत्यांना बसेल धक्का!


Deepika Padukone Baby Girl: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. दीपिका आणि रणवीर आता अखेर आई-वडील झाले आहेत. दीपिकाने ८ सप्टेंबर रोजी एचएन रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर दीपवीरचे चाहते आणि स्टार्सकडून अभिनंदन करण्यात आले. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीला अद्याप रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. दीपिकाच्या छोट्या परीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. मात्र, यासाठी चाहत्यांना आता मोठी वाट बघावी लागणार आहे. दीपिका आणि रणवीर आपल्या बाळाचा फोटो इतक्यात शेअर करणार नसल्याचे म्हटले जात आहे.



Source link