
अभिनेता दीपक तिजोरी याचा जन्म २८ ऑगस्ट १९६१ रोजी मुंबईत झाला. सुरुवातीपासूनच त्याला अभिनयाची गोडी लागली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीपक ‘अभिनेता’ बनण्याच्या इच्छेने एका थिएटर ग्रुपमध्ये सामील झाला होता. या ग्रुपमध्ये आमिर खान, आशुतोष गोवारीकर, परेश रावल आणि विपुल दोशी देखील होते. त्याने अभिनयाचा निर्णय तर घेतला होता. पण, या दरम्यान त्याला काम मिळत नव्हते. तब्बल ३ वर्षे तो निर्मात्यांची दारं फिरत होता. पण, तरीही काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान, त्याने एका मासिकामध्ये एक्झिक्युटिव्ह आणि मुंबईतील ‘सी रॉक’ हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम देखील केले.







