माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते – पाटील हे निवडणूक लढविणार : जयसिंह मोहिते पाटील

0
7
माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते – पाटील हे निवडणूक लढविणार : जयसिंह मोहिते पाटील

अकलूज प्रतिनिधी :माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह (बाळदादा ) मोहिते – पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते – पाटील हे निवडणूक लढविणार असल्याची माहिती दिली आहे .

भाजपातून तिकीट न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटील गटातील नाराजी मिटण्याची आशा मावळली असून अकलूज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घेणार असल्याचा निर्णय बुधवार दि. २७ रोजी बोलून दाखवला आहे. यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्याचा निर्धार केल्याचेही जयसिंह मोहिते पाटील यांनी जाहीर केले आहे.

माढा लोकसभा मतदार संघातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवाराची मागणी केले होती परतू भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना च्याच परत तिकीट दिल्यामुळे मोहिते पाटील कुटुंब नाराज झाले आहे ; त्यांच्या बरोबर फलटण तालुक्यातील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही आपले बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी ही मागितल होती . भाजप नी आपली पक्षाची उमेदवारी रणजितसिंह नाईक निंबाळकर जाहीर केल्यानंतर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नाराज असल्याचे बोलले जात आहे . अशातच धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघ हा पिंजून काढला आहे लोकसभा मतदारसंघात सर्वत्र फिरून लोकांच्या भावना जाणून घेतले आहे .

अकलूज येथे पत्रकारांशी संवाद साधताना जयसिंह ( बाळदादा ) मोहिते पाटील बोलत होते आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माढा, बारामती , व कोलहापूर या ठिकाणी भारतीय पार्टीचा उमेदवार निवडून येवू शकत नाही . यासोबतच माण , करमाळा माळशिरस व सांगोला या ठिकाणी विधानसभेला सुद्धा नक्कीच फटका बसणार आहे ; असे मत मांडले आहे . यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे इच्छूक उमेदवार धैर्यशील मोहिते – पाटील हे ही उपस्थित होते .