
‘दादा कोंडके हे मराठी चित्रपटांचे महारथी होते. ९ सिल्व्हर ज्युबिली चित्रपट, प्रचंड यश, प्रसिध्दी, वलय मिळवूनही त्यांच्या डोक्यात यशाची हवा कधीच गेली नव्हती. त्यांचा साधेपणा कायम आवडायचा. माझ्यासोबत मराठी, हिंदीतील एक यशस्वी अभिनेता, निर्माता आहे असं कधीच वाटलं नाही ते त्यांच्या साधेपणामुळेच. बंडी, नाडीची चड्डी, त्यांच्या केसांची स्टाईल, मिशीचा कट हे सगळच भन्नाट होतं. ते नायक म्हणून जसे पडद्यावर दिसायचे तसेच खऱ्या आयुष्यात होते. दादांचे चित्रपट आता थिएटरला दिसत नाहीत, पण आजच्या पिढीला दादा कोंडके यांचे चित्रपट दाखवण्याची ही कल्पना खूपच स्तुत्य आहे’, असे रजा मुराद म्हणाले.








