Cylinder Blast | सिलिंडर बदलताना घ्या काळजी ! गॅस गळती होऊन ‘इथं’ लागली आग, तीन मुलांसह पाच जणांचा होरपळून मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)

0
20
Cylinder Blast | सिलिंडर बदलताना घ्या काळजी ! गॅस गळती होऊन ‘इथं’ लागली आग, तीन मुलांसह पाच जणांचा होरपळून मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)


संग्रहित फोटो

एलपीजी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी जयपूरमध्ये घडली. मृतांमध्ये एका तरुण जोडप्यासह त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे.

जयपूर : एलपीजी सिलिंडरमधून गॅस गळती होऊन आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी जयपूरमध्ये घडली. मृतांमध्ये एका तरुण जोडप्यासह त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश यादव (वय 25) हे सिलिंडर बदलत असताना सिलिंडरमधून गॅस गळती होऊन अचानक आग लागली.

या आगीत राजेश यादव, त्यांची पत्नी रुबी (वय 24), त्यांच्या मुली इशू (वय 7), खुशमणी (वय 4) आणि मुलगा दिलखुश (वय 2) यांचा जागीच मृत्यू झाला. मृतक कुटुंब भाड्याच्या खोलीत राहत होते. घटनेच्यावेळी त्यांच्यापैकी कोणीही बाहेर येऊ शकले नाही. आगीने संपूर्ण खोलीला वेढले आणि सर्वजण जिवंत जळाले. या घरात 17-18 खोल्या आहेत. यातील एका खोलीत राजेशचे कुटुंबीय गेल्या चार महिन्यांपासून राहत होते. हे कुटुंब मूळचे मोतिहारी, बिहारचे आहे.






Source link