
Cyclone Hamoon news Update : अरबी समुद्रानंतर आता बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होत आहे. हे चक्रीवादळ उग्र रूप धारण करत असून बुधवारी हे वादळ किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळाचा मोठा परिणाम देशातील काही राज्यांवर होणार आहे. आधी अरबी समुद्रात तयार झालेले ‘तेज’ चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला होता. मात्र, हे वादळ आता अरब देशांच्या दिशेने सरकले. मात्र, बंगालच्या उपसागरात ‘हमून’ वादळ तयार झाले असून या वादळाबाबत हवामान खात्याने मोठा अपडेट दिला आहे.








