Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधान; एका चुकीमुळं नवी मुंबईतील व्यक्तीनं १ कोटी ७ लाख गमावले!

0
18
Cyber Crime: शेअर बाजारात गुंतवणूक करताना सावधान; एका चुकीमुळं नवी मुंबईतील व्यक्तीनं १ कोटी ७ लाख गमावले!

पीडितेने एकूण १ कोटी ०७ लाख ९ हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ट्रान्सफर केले. मात्र, त्यांनी परतावा आणि गुंतवलेले पैसे परत मागितले असता फसवणूक करणाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यक्तीने सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९ (व्यक्तीद्वारे फसवणूक), ४२० (फसवणूक), ३४ (समान हेतू) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील तरतुदींनुसार रविवारी गुन्हा दाखल केला.

Source link