
या ट्रेलरमध्ये दिसते की, एका क्षणी तब्बूला कळते की, ती ज्या कंपनीसाठी काम करत आहे, ती कंपनी दिवाळखोर झाली आहे. तर, त्या तिघींच्याही आयुष्यात आपापले संघर्ष आहेत. दरम्यान, त्यांना एक प्रवाशी भेटतो, जो मृत असून त्याच्याकडे सोन्याची बिस्किटे आहेत. इथून कथेत ट्विस्ट येतो. आपली सगळी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी, त्या या व्यक्तीकडचे सोने चोरायचे ठरवतात. कस्टम अधिकारी म्हणून दिलजीत दोसांझची एन्ट्री झाल्यानंतर कथेत नवा ट्विस्ट येणार आहे. तर, कॉमेडियन कपिल शर्माची भूमिकाही खूप महत्त्वाची असल्याचे दिसते आहे. एकूणच, ‘द क्रू’चा ट्रेलर एक पूर्ण मनोरंजन पॅकेज आहे, ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन या चोरीतून सुटू शकतील का? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळणार आहे.







