
Corona JN.1 Virus : कोरोनाचा JN 1 या नव्या विषाणूने जगभरात चिंता वाढवली आहे. केवळ चीन-सिंगापूरच नाही तर आता भारतातूनही या विषाणूने बाधित अनेक नागरीक आढळत आहेत. हा संसर्ग वेगाने पसरत आहे. आतापर्यंत केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्याच्या काही भागांमध्ये या विषाणूने बाधित नागरीक आढळले आहेत. Omicron च्या JN.1 या नवीन सब-व्हेरियंटमुळे कोरोनाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. कोरोनासंदर्भातील ताज्या संशोधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. संशोधात असे आढळून आले आहे की या धोकादायक विषाणूमुळे केवळ चव आणि गंधच नाही तर घशाचेही गंभीर नुकसान होऊ शकते. एका १५ वर्षांच्या मुलीचा आवाज कोरोना विषाणूमुळे गेल्याचे संशोधनात आढळले आहे.