मुंबई, दि. 19 जुलै 2025 (साहस टाइम्स प्रतिनिधी): महाराष्ट्रातील बुद्ध लेणी संवर्धन समिती आणि राज्यातील सर्व लेणी संवर्धक समूह यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. 19 जुलै 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मुंबईतील आझाद मैदानावर भव्य लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे आंदोलन केंद्र सरकारच्या भारतीय पुरातत्व विभाग (ASI) विरुद्ध असून, बुद्ध लेण्यांवरील अतिक्रमण, दुर्लक्ष, असुविधा आणि दुजाभाव या मुद्द्यांवर ठोस उत्तरं मागण्यासाठी आयोजित करण्यात आले आहे. राज्यभरातून अनेक बुद्ध लेणी अभ्यासक, संवर्धक, पुरातन वास्तू प्रेमी, संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होणार आहेत.
आंदोलनातील मुख्य प्रश्न:
- बुद्ध लेणींवरील अतिक्रमण कधी हटवणार?
- बेवारस लेणी आणि स्तूप ASI मध्ये केव्हा समाविष्ट होणार?
- बौद्ध वारसाच्या विकासासाठी आलेला निधी कुठे जातो?
- बुद्ध लेणींवर प्रशिक्षित गाईड ASI कडून का नियुक्त होत नाहीत?
- बौद्धांना वंदना करण्यास मज्जाव, पण इतरांना पूजा कशी काय परवानगी?
- बुद्ध लेणींना मूलभूत सुविधा (पाणी, विज, स्वच्छतागृह) कधी मिळणार?
- लेण्यांना ‘बुद्ध लेणी’ असं नाव का दिलं जात नाही? ‘लेणी’ असा एकेरी उल्लेख का?
- बौद्ध इतिहास सांगणारे माहितीफलक का लावले जात नाहीत?
मार्गदर्शक मंडळी:
आदरणीय भीमराव यशवंत आंबेडकर (राष्ट्रीय कार्याध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा), मा. गोपीचंद कांबळे, परमानंद गेडाम, विलास खरात, महेंद्र शेगांवकर, धम्मपाल माशाळकर, अनिल जगताप, संजय पाईकराव, अशोक नगरे, अतुल भोसेकर, नंदकुमार कासारे, सुरज जगताप, सौरभ भोसले, प्रफुल्ल पुरळकर आदी मान्यवर आंदोलनात मार्गदर्शन करणार आहेत.
आंदोलनाचे आयोजक:
सेव बुद्धा केव अँड हेरिटेज लेणी संवर्धक, पुणे, समता सैनिक दल – लेणी संवर्धक युनिट, मुंबई, सनातन धम्म महाराष्ट्र, सह्याद्री लेणी संवर्धक, वाई, प्रबुद्ध भारत फाउंडेशन, जुत्तर, बौद्ध युवा जागृती परिषद, कराड, बुद्धभूमी प्रतिष्ठान, मावळ, MBCPR, ABCPR, अशोका वॉरियर्स, एकजूट, कर्जत, केसनंद लेणी संवर्धक गट, इत्यादी अनेक संघटनांचा सहभाग आहे.
संयोजक संपर्क:
दीपक गायकवाड – 8605695860 (पुणे)
प्रभाकर जोगदंड – 7738635980 (मुंबई)
विजय खुडे – 9158187383 (पुणे)
सारिका कांबळे – 9766523994 (पिं-चिंचवड)
दादासाहेब आगळे – 8888309972 (मावळ)
कैलास कांबळे – 7038564995 (कराड)
व आणखी बरेच संयोजक विविध जिल्ह्यातून…
आंदोलनाचा उद्देश:
बुद्ध लेणी ही केवळ पुरातन वास्तू नसून आपल्या सामाजिक अस्मितेचे प्रतीक आहेत. त्यांच्या जतनासाठी, संवर्धनासाठी आणि न्याय्य स्थानासाठी हे आंदोलन राबवले जात आहे. लेण्यांचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक वारसा अबाधित ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी या आंदोलनात उपस्थित राहून आपला पाठिंबा नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.