Chhattisgarh News | निवडणुकीच्या धामधुमीत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ४ जणांना कंठस्नान! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
21
Chhattisgarh News | निवडणुकीच्या धामधुमीत छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, ४ जणांना कंठस्नान! | Navarashtra (नवराष्ट्र)


file photo

file photo

बस्तर विभागातील सातही जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे. नक्षलवादाविरोधातील निर्णायक लढा म्हणून याकडे पाहिले जात आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर अनेक नक्षलवादी मारले गेले.

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धामधूम सुरू आहे. अशातच छत्तीसगडमध्ये नक्षलवादी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात सुरक्षा दलांनी माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली आहे.  डीआरजी बस्तर फायटर्स कोब्रा बटालियन आणि सीआरपीएफ यांच्या विजापूरच्या गांगलूर भागात संयुक्त कारवाई सुरू आहे.  सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत ४ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती आहे. दोन्ही बाजूंनी अजूनही गोळीबार सुरू असून आकडा वाढू शकतो.

हे सुद्धा वाचा

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, चकमकीत चार नक्षलवादी ठार झाले असून ही संख्या वाढू शकते. अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात अनेक कारवाया करण्यात आल्या असून त्यात सुरक्षा दलांनी आतापर्यंत 9 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. नुकतेच विजापूर जिल्ह्यातही ६ नक्षलवादी मारले गेले.






Source link