
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी (Chhattisgarh Assembly Election) काँग्रेसमध्ये दाखल झालेले आदिवासी नेते नंदकुमार साय (Nandkumar Rai) यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे.
रायपूर : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी (Chhattisgarh Assembly Election) काँग्रेसमध्ये दाखल झालेले आदिवासी नेते नंदकुमार साय (Nandkumar Rai) यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिला आहे. छत्तीसगड निवडणुकीच्या विधानसभा निकालानंतर अवघ्या 17 दिवसांत नंदकुमार साय यांनी काँग्रेस सोडली आहे.
छत्तीसगड निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर संपूर्ण काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. नंदकुमार साय यांनी यू-टर्न घेत आपला राजीनामा पीसीसी प्रमुख दीपक बैज यांच्याकडे सोपवला आहे. नंदकुमार साय यांनी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा सोडली होती. 30 एप्रिल 2023 रोजी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. 1 मे कामगार दिनी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तब्बल 9 महिने काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर साय यांनी काँग्रेसला अलविदा केला आहे.








