Chhatrapati Shivaji Maharaj Statue | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते आज जम्मू काश्मिरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Chhatrapati Shivaji Maharaj Statue | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते आज जम्मू काश्मिरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण! | Navarashtra (नवराष्ट्र)


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते आज जम्मू काश्मिरमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण!

जम्मू काश्मीरमधील कुपवाड्यात आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ उभारला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्या हस्ते या पुतळ्याच अनावरण करण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळा (Chhatrapati Shivaji Maharaj Statue ) उभारण्यात येत आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या पुतळ्याच अनावरण करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मान्यमर मंडळी जम्मू-काश्मिरमधील कुपवाड्यात दाखल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार श्रीनगरमध्ये शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी दाखल झाले आहेत. कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण आज पार पडणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारदेखील उपस्थित राहणार आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे जवानांसोबत दिवाळी फराळाचा आनंद देखील घेणार आहेत. आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकारानं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काश्मीरमधील कुपवाडा येथे उभारण्यात आला आहे.






Source link