Charan Singh : चरणसिंह यांना ‘भारतरत्न’ देण्यामागे काय आहे राजकीय गणित? जाणून घ्या!

0
18
Charan Singh : चरणसिंह यांना ‘भारतरत्न’ देण्यामागे काय आहे राजकीय गणित? जाणून घ्या!


शेतकरी आंदोलनाचा रोष अद्याप कायम

केंद्र सरकारनं आणलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात २०२० मध्ये पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांनी तब्बल वर्षभर आंदोलन केलं होतं. हजारो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर तळ ठोकला होता. त्या काळात आंदोलक शेतकरी व सरकारमध्ये तीव्र मतभेद झाले होते. भाजप समर्थकांकडून शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणूनही हिणवलं गेलं होतं. कृषी कायदे मागे घेतले गेल्यानंतर हे आंदोलन संपलं, मात्र भाजपविषयीचा रोष अद्यापही कायम आहे. २०२२ मध्ये यूपीच्या निवडणुकीत भाजपनं विजय मिळवला, पण शेतकरी व जाट यांचा भाजपवरचा रोष कायम राहिला. चरणसिंह यांना भारतरत्न देऊन तो रोष कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं मानलं जात आहे. या निर्णयामुळं भाजपला हरियाणा विधानसभा निवडणुकीतही फायदा होणार आहे.



Source link