फलटण (साहस Times ) :- महाराष्ट्र राज्य गृह विभागाने आज एक महत्त्वाचा निर्णय घेत उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) श्री. राहुल धस यांची बदली नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) पदावर केली आहे. त्यांच्या जागी आता जालना जिल्ह्यातील अंबड उपविभागाचे DYSP श्री. विशाल खांबे यांची नियुक्ती फलटण उपविभागात करण्यात आली आहे.
नवीन नियुक्त अधिकारी श्री. विशाल खांबे हे यापूर्वी अंबड येथे काम पाहत होते. आता त्यांच्यावर फलटण उपविभागाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, ते लवकरच आपला कार्यभार स्वीकारणार आहेत.
या बदल्यांमुळे स्थानिक गुन्हे तपास, कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसी प्रशासनात काही प्रमाणात नवीन दृष्टिकोन आणि कार्यपद्धती पाहायला मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.