कोल्हापुरच्या अनुस्कुरा भागात राहणारी विद्यार्थीनी हर्षदा कांबळे या चिमुकलीनं अमृता खानविलकरच्या चंद्रा या गाण्यावर डान्स केला आहे. तिची नृत्यशैली चांगली असल्यामुळं शाळेतील शिक्षकांनी व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला. अनेकांनी व्हायरल व्हिडिओला दाद देत हर्षदाचं कौतुक केलं आहे. जेव्हा हा व्हिडिओ अमृता खानविलकरने पाहिला तर तिने थेट व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत चिमुकलीचं कौतुक केलं आहे. ‘चिमुकली चंद्रा’, असं सुपर कॅप्शन दिलं आहे. त्यानंतर अमृताच्या चाहत्यांनी देखील चिमुकलीचं कौतुक करत व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.