
विशेष म्हणजे या गाण्याचे संगीतकार, गीतकार आणि गायक हरिश वांगीकर असून, या गाण्याचे संगीत संयोजक मॅक्सवेल फर्नांडीस आहे. तर, गाण्याचे दिग्दर्शक कैलास पवार आहेत. हे गाणं अविनाश पायाळ याने कोरिओग्राफ केलं आहे. शिवाय प्रसन्नाचं रॅप साँग देखील यात आहे. यंदा पावसाचे दिवस असूनही, तितकासा पाऊस पडत नाहीय. म्हणून प्रथमच आर्टिफिशियल पावसात ‘छम छम पाऊस’ हे गाणं शूट करण्यात आलं.








