
विनातिकीट आणि असुरक्षित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेकडून लोकल रेल्वे सेवा, मेल, एक्स्प्रेस आणि विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात येते. विनातिकीट प्रवास आणि अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी ही मोहीम राबविली जाते. एप्रिल ते जून कालावधीत अशा कारवाईत मध्य रेल्वेने तब्बल ९४.०४ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे, रेल्वेने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा ही दंडवसुली ४१.४२ टक्के अधिक आहे.







