Sunday, September 20, 2026
Homeसाताराअनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत मुकबधीर मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत मुकबधीर मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप

फलटण: शहरातील प्रसिद्ध श्री दत्त भेळ सेंटरचे मालक सुभाष मठपती यांचे चिरंजीव विश्वजित मठपती यांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा केला. महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करत त्यांनी या दिवसाचे औचित्य साधले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले, ज्याने उपस्थितांना अनोखा आनंद मिळाला.

कार्यक्रमात महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या प्राचार्या सौ. वैशाली शिंदे, सौ. हेमा गोडसे, युवानेते प्रितसिंह खानविलकर, अमर पिसाळ, प्रद्युम्न मठपती व तेजस मठपती हे मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments