ज्ञानाच्या २५ वर्षांचा उत्सव; पुण्यात एमकेसीएलचा रौप्य महोत्सव उत्साहात

0
5
ज्ञानाच्या २५ वर्षांचा उत्सव; पुण्यात एमकेसीएलचा रौप्य महोत्सव उत्साहात

फलटण :- काल दिनांक २० ऑगस्ट रोजी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम पुणे येथे उत्साहात पार पडला.
या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील, माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिषजी शेलार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

एमकेसीएलच्या या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासात अगदी सुरुवातीपासून सोबत असलेल्या अधिकृत लर्निंग सेंटर्सनाही आमंत्रित करण्यात आले होते. यामध्ये शहरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. ला देखील उपस्थित राहण्याचा मान मिळाला.

एमकेसीएलच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.