
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयने अखिलेश यादव यांना नोटीस पाठवून 29 फेब्रुवारीला साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
लखनौ : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांची सीबीआय चौकशी होणार आहे. सीबीआयने अखिलेश यादव यांना नोटीस पाठवून 29 फेब्रुवारीला साक्षीदार म्हणून हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. हे संपूर्ण प्रकरण अखिलेश यादव राज्याचे मुख्यमंत्री असतानाच्या बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित आहे.
यादव यांना 160 सीआरपीसी अंतर्गत चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. अखिलेश यादव 2012 ते 2017 दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी 2012 ते 2013 दरम्यान राज्याचे खाणकाम मंत्रालयही त्यांच्याकडेच होते. त्यावेळी अवैध उत्खननाबाबत गंभीर आरोप झाले होते. त्यामुळे सीबीआयने यादव यांना नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावल्याची चर्चा आहे.










