Call Forwarding | टेलिकॉम मंत्र्यालयाचा मोठा निर्णय, १५ एप्रिलपासून होणार ‘ही’ सेवा बंद | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
Call Forwarding | टेलिकॉम मंत्र्यालयाचा मोठा निर्णय, १५ एप्रिलपासून होणार ‘ही’ सेवा बंद | Navarashtra (नवराष्ट्र)


टेलिकॉम मंत्र्यालयाचा मोठा निर्णय, १५ एप्रिलपासून होणार ‘ही’ सेवा बंद

भारतामध्ये मागील अनेक वर्षांपासून ‘सायबर क्राइम’ संदर्भात गुन्हे घडत आहेत. त्यात ‘कॉल फॉरवर्डिंग स्कॅम’मध्ये वाढ झाली आहे.

भारतामध्ये मागील अनेक वर्षांपासून ‘सायबर क्राइम’ संदर्भात गुन्हे घडत आहेत. त्यात ‘कॉल फॉरवर्डिंग स्कॅम’मध्ये वाढ झाली आहे. या सगळ्यावर आळा घालण्यासाठी टेलिकॉम मंत्र्यालयाने मोठा निर्णय घेतला आहे. टेलिकॉम मंत्र्यालयाने घेतलेल्या निर्णयानुसार, १५ एप्रिल २०२४ पासून देशभरात USSD आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा तात्पुरत्या स्थगित केला जाणार आहे.

सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या USSD-based कॉल फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचना येईपर्यंत रद्द करण्यात येणार आहे. या संदर्भात टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले आहेत, असे टेलिकॉम मंत्र्यालयाकडून आदेश देण्यात आले. त्यामुळे ही सेवा कायमची न बंद करता तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे, असे टेलिकॉम मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.






Source link