
मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स येथे सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्सच्या मोकळ्या जागेचा वापर मुंबईकर रोज योगासने, धावणे, चालण्यासाठी करतात. त्यामुळे या मोक्याच्या जागी सेंट्रल पार्क उभारण्याची तयारी सरकारने केली आहे. एमएमआरडीएच्या प्रकल्पांसाठी २४ कोटी शासन हमी देण्यालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.




