Budget 2025 Live Updates: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सर्व माहिती एका क्लिकवर

0
67
Budget 2025 Live Updates: केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत सर्व माहिती एका क्लिकवर


केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ बाबत सर्व माहिती एका क्लिकवर

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ बाबत सर्व माहिती एका क्लिकवर
  • twitter
  • Share on Facebook

मोदी ३.० सरकारचा केंद्रीय अर्थसंकल्प आज सादर होणार असून निर्मला सीतारमण यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sat, 01 Feb 202501:20 AM IST

Income Tax: आयकरात सवलत मिळण्याची आशा वाढली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात सवलत मिळण्याची आशा वाढली आहे. विशेषतः कनिष्ठ मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पात काही दिलासा मिळू शकतो.

Sat, 01 Feb 202512:41 AM IST

FICCI: केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी एफआयसीसीआय अध्यक्षांनी काय म्हटले?

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी एफआयसीसीआय अध्यक्ष म्हणाले की, सकल देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीच्या बाबतीत, एफआयसीसीआयचा अंदाज सरकारच्या अंदाजापेक्षा थोडा जास्त आहे. परंतु, केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ मध्ये वापर आणि गुंतवणूक मागणी दोन्ही वाढण्याची अपेक्षा आहे. ग्राहकांना अधिक खर्च करण्यायोग्य उत्पन्न मिळावे, यासाठी कर रचनेत तर्कसंगत बदल करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

Sat, 01 Feb 202512:35 AM IST

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा वाढू शकते

किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा पाच लाखापर्यंत वाढवण्याची सरकारची तयारी आहे. सध्या किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत जास्तीत जास्त कर्ज घेण्याची मर्यादा ३ लाख रुपये आहे.

Sat, 01 Feb 202512:34 AM IST

Budget 2025 Live: ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता

मोदी ३.० अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विम्याच्या हप्त्याची मर्यादा एक लाख रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. इतरांसाठी आरोग्य विम्याच्या हप्त्याची मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते.

Sat, 01 Feb 202512:33 AM IST

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या रक्कमेत वाढ होण्याची शक्यता

देशाच्या अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेच्या रक्कम वाढ केली जाण्याची  शक्यता आहे. बोफाच्या अहवालानुसार,  पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदतीची रक्कम वार्षिक १२ हजार रुपयांपर्यंत वाढवता येऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये हस्तांतरित केले जातात.

Sat, 01 Feb 202512:28 AM IST

Budget 2025 Live: केंद्र सरकार रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर भर देणार

अर्थसंकल्पापूर्वी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सभागृहात सादर करण्यात आला. यानुसार, २०२५-२६ मध्ये जीडीपी वाढ ६.३ ते ६.८ टक्क्यांच्या दरम्यान असू शकते. हा अंदाज सरकारच्या आधीच्या अंदाजांपेक्षा कमी आहे. सर्वेक्षणात केंद्र सरकारने रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याबद्दल सांगितले आहे.

Sat, 01 Feb 202512:25 AM IST

Nirmala Sitharaman: सलग आठव्यांदा निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारपासूनच सुरू झाले आहे. मोदी सरकार आज लोकसभेत सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकार ३.० चा हा पहिलाच पूर्ण अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासाठीही एक विक्रम असेल.





Source link