“फलटण-कोरेगाव विधानसभेत बौद्ध समाजाचा प्रतिनिधी: प्रा. रमेश आढाव निवडणुकीत उतरले!”

0
1
“फलटण-कोरेगाव विधानसभेत बौद्ध समाजाचा प्रतिनिधी: प्रा. रमेश आढाव निवडणुकीत उतरले!”


फलटण :-फलटण-कोरेगाव अनुसूचित जाती मतदारसंघातून संविधान समर्थन समिती व परिवर्तन महाशक्ती विकास आघाडीच्या वतीने प्रा. रमेश आढाव निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सामाजिक कार्यकर्ते नंदू मोरे यांनी त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांना मत देण्याचे आवाहन केले. प्रा. आढाव यांनी फलटण तालुक्यातील प्रश्नांचा सखोल अभ्यास केला आहे, ज्यामुळे ते सामान्य जनतेचे खरे प्रतिनिधी असल्याचे मोरे म्हणाले.

प्रा. आढाव हे पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत आहेत. संविधान समर्थन समितीने विविध पक्षांकडे बौद्ध समाजाला उमेदवारी देण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वच प्रस्थापित पक्षांनी या मागणीकडे दुर्लक्ष केले. अखेर समितीने समाजाच्या प्रश्नांना समर्पित असणाऱ्या प्रा. रमेश आढाव यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

महात्मा फुले, शाहू महाराज, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार करणारे प्रा. आढाव हे आमच्या संस्कृतीचा वारसा जपणारे आहेत, असे मतदारांनी विधानसभेत त्यांनाच पाठवावे अशी आशा मोरे यांनी व्यक्त केली.