
Government Job 2024: बिहार लोकसेवा आयोग बिहार सरकारच्या आरोग्य विभागांतर्गत वैद्यकीय रुग्णालये आणि विद्यापीठे/ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक (वैद्यकीय) पदांच्या १ हजार ३३९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावर bpsc.bih.nic.in येथे पाठवावे. अर्ज करण्यासाठी, अर्जदारांना लॉगिन पृष्ठावर त्यांचे नोंदणीकृत नाव आणि पासवर्डसह साइन इन करणे आवश्यक आहे. बीपीएससीनुसार, उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रता आणि इतर निकषांचे तपशीलवार मूल्यमापन करून केली जाईल.







