Boiler Blast In Factory | हरियाणात मोठी दुर्घटना! एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने किमान 100 कामगार जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Boiler Blast In Factory | हरियाणात मोठी दुर्घटना! एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याने किमान 100 कामगार जखमी | Navarashtra (नवराष्ट्र)


बहुतांश लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना रोहतक येथे रेफर करण्यात आले आहे.

हरियाणात मोठी दुर्घटना घडली आहे. रेवाडी येथे एका कारखान्यात मोठा अपघात झाला.  कारखान्यातील बॉयलर स्फोटात (Boiler Blast In Factory) 100 कामगार जखमी झाले आहेत. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. एका कामगाराची प्रकृती चिंताजनक असल्याने रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन त्याला रोहतक येथे रेफर करण्यात आले आहे. इतर रुग्णालयांना सतर्क करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जखमींच्या मदतीसाठी अतिरिक्त रुग्णवाहिकांची व्यवस्था करून कारखान्यात पाठवण्यात आली आहे.

शनिवारी सायंकाळी झाला अपघात

मिळालेल्या शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास लाईफ लाँग फॅक्टरीत अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली. बॉयलर फुटल्याचे कामगारांनी सांगितले. बॉयलरचा स्फोट झाल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मजूर आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.






Source link