
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजप पुन्हा एकदा ऑपरेशन लोटस राबवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या ऑपरेशन अंतर्गत शरद पवार गटाचे काही खासदार फोडून त्या मतदारसंघात पोटनिवडणुका लावल्या जाऊ शकतात, अशी माहिती आहे. . मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडीचे एकूण ३१ खासदार निवडून आले तर शरद पवार गटाचे ८खासदार निवडून आले होते. यापैकी पाच ते सहा खासदारांना गळाला लावून शरद पवारांचा उरला सुरला पक्ष संपवण्याचा प्लॅन भाजप आखत असल्याचे सांगितले जात आहे.





