
कराड : पाटण तालुक्यात भाजप मजबूत स्थितीत आला असून, भाजपने आतापर्यंत केलेला विकास घराघरांत पोहोचवून पक्ष मजबुतीसाठी प्रयत्न करा, महाराष्ट्र हे सर्वश्रेष्ठ राज्य बनविण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाला साथ देऊन सर्व उपक्रम घराघरांत पोहोचवा, भाजपमध्ये गटबाजी चालत नाही, हे लक्षात घेऊन भविष्यात सबकुछ भाजप करण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन भाजपचे प्रदेश सचिव व केंद्रीय खनिज महामंडळाचे सदस्य भरत पाटील यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पाटण दक्षिण मंडलातर्फे ढेबेवाडीत आयोजित रक्तदान शिबिराच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा नेते याज्ञसेन पाटणकर, हिंदुराव पाटील, जिल्हा महिला मोर्चा सचिव कविता कचरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. विक्रम पावसकर म्हणाले, पाटण तालुक्यात भाजप खरोखर मजबूत झाली आहे. आता सर्वांनी घराघरांत भाजप पोहोचवावी व मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करावेत.