
बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींनी आत्मसमर्पणापासून दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ११ पैकी १० दोषींची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामध्ये वेगवेगळी कारणे देऊन आत्मसमर्पणापासून दिलासा देण्याची मागणी केली होती. सुनावणी वेळी जस्टिस नागरथाना यांनी म्हटले की, याचिकेला रिकॉर्डवर घेतले आहे. यावेळी खंडपीठाने म्हटले की, याचिकेत काही दम नाही. यामुळे या याचिका आम्ही फेटाळून लावत आहे. त्याचबरोबर सर्व दोषींनी २१ जानेवारीपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण करावे.








