Bihar fire incident | ट्रान्सफॉर्मर ठरला काळ! शॉर्टसर्किटमुळे झोपडीला आग लागून पाच मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
23
Bihar fire incident | ट्रान्सफॉर्मर ठरला काळ! शॉर्टसर्किटमुळे झोपडीला आग लागून पाच मुलांसह सात जणांचा होरपळून मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)


संग्रहित फोटो

संग्रहित फोटो

ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने झोपडीला लागलेल्या आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. हे सातही जण एकाच कुटुंबातील होते.

छत्तीसगडमध्ये मंगळवारी रात्री एका खासगी कंपनीची बस 50 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण  अपघातात (Chhattisgarh Bus Accident) 14 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले आहेत. हा घटना ताजी असतानाच आता बिहारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. बिहारच्या रोहतास जिल्ह्यात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने एका झोपडीला आग (Bihar fire incident) लागून सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. हे सातही जण एकाच कुटुंबातील होते.या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली.

हे सुद्धा वाचा

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की,  सासारामच्या इब्राहिमपूर गावात ही घटना घडली. झोपडीला आग लागली तेव्हा कुटुंबीय घरातच होते. पुरुष सदस्य बाहेर होते. या आगीत घरात उपस्थित असलेल्या तीन महिला आणि पाच मुले आतमध्ये अडकली. आग चारही बाजूंनी पसरली आणि संपूर्ण झोपडीला आग लागली. वाऱ्यामुळे ज्वाला अधिकच तीव्र होत होत्या. लोकांनी आग आटोक्यात आणण्याआधी, बहुतेक जण गुदमरून आणि भाजल्याने मरण पावले. केवळ एका महिलेला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.






Source link