
अदनानने विशाल आणि लवकेशच्या मैत्रीला लावला सुरुंग!
वाईल्ड कार्ड एन्ट्री करताच बिग बॉस अदनान शेखला प्रश्न विचारतात की, तू इथे काही उद्देशाने आला आहेस का? यावर तो म्हणतो की, लवकेश कटारिया विशालचा वापर करत आहे. त्यावेळी मी असतो, तर मी त्याला कानाखाली मारली असती, असे लवकेशने म्हटले होते. त्यानंतरच अरमानने त्याच्यावर हात उचलला होता. मग, अदनान घरात शिरतो आणि विशाल त्याला घट्ट मिठी मारतो. यानंतर, लवकेश कटारिया म्हणतो की, तू त्याच्याशी खोटं बोलला आहेस, त्यावर अदनान म्हणतो की, तू का इतका गरम झाला आहेस यार. ‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घराचे चित्र आता पूर्णपणे बदलणार असल्याचे प्रोमोवरून स्पष्ट होत आहे.







