Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातील ‘हा’ अभिनेता ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये झळकणार? पोस्ट चर्चेत!

0
19
Bigg Boss Marathi 5: रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातील ‘हा’ अभिनेता ‘बिग बॉस मराठी ५’मध्ये झळकणार? पोस्ट चर्चेत!


पोस्टमध्ये काय म्हणाला शुभंकर तावडे?

अभिनेता शुभंकर तावडे याने शेअर केलेल्या या स्टोरीमध्ये त्याने लिहिलेय की, ‘या सीझनमध्ये काहीतरी घडणार आहे. मी पावसाळ्याबद्दल बोलतोय की आणखी कशाबद्दल? ते कशाबद्दलही असो, पण मी कुठेतरी जातोय हे नक्की.’ त्याच्या या पोस्टमध्ये त्याने एका ठिकाणी ‘बीबी’ असं म्हटल्याने तो ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात दिसणार असल्याचा कयास चाहते बांधत आहेत. आता यावर अधिकृत शिक्कामोर्तब कधी होणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. तर, शुभंकर तावडे खरंच या शोमध्ये दिसणार की, त्याचा एखादा दुसराच प्रोजेक्ट आपल्या भेटीला येणार, याबद्दल चाहते संभ्रमात आहेत.



Source link