
बिग बॉस १७चे घर हे दिल, दिमाग आणि दम या तीन भागांमध्ये दिसणार आहे. यावेळी कपल विरुद्ध सिंगल अशी थिम असणार आहे.शोमध्ये ५ सिंगल स्पर्धक आणि ४ कपल दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. अंकिता लोखंडे, विकी जैन, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार या स्पर्धकांची नावे समोर आली आहेत. १५ ऑक्टोबर पासून बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.








