
मन्नारा आणि अंकिताच्या या व्हिडीओवर ‘बिग बॉस’च्या चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी अंकिताला तिच्या या वागण्यामुळे ‘टॉक्सिक’ म्हटले आहे. काही चाहत्यांनी तर अंकिताला चांगलेच फटकारले आहे. ‘बिग बॉस १७’मध्ये सध्या १७ स्पर्धकांची चुरस पाहायला मिळत आहे. सध्या घरात असलेल्या या स्पर्धकांच्या यादीमध्ये टीव्ही, चित्रपट आणि सोशल मीडिया स्टार्सचा समावेश आहे. अंकिता लोखंडे, मन्नारा चोप्रा, अभिषेक कुमार, नाविद, मुनव्वर फारुकी, विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा, नील भट्ट, ईशा मालवीय, सना रईस खान, सोनिया बन्सल, अनुराग डोवाल, जिग्ना व्होरा, फिरोझा खान, सनी आर्य, रिंकू धवन आणि अरुण श्रीकांत मशेट्टी हे सेलिब्रिटी सध्या घरात आहेत.








