फलटण शहरातील पोलीस प्रशासनात मोठा बदल!

0
60
फलटण शहरातील पोलीस प्रशासनात मोठा बदल!

फलटण प्रतिनिधी –फलटण शहर पोलीस ठाण्याच्या कार्यशैलीत मोठा फेरबदल होत असून, निष्क्रियतेचा ठपका लागलेले पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची अखेर तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

गेल्या काही महिन्यांपासून शहरात वाढलेले अवैध धंदे, मटका-जुगार, चक्री व्यवसाय, आणि कायदा-सुव्यवस्थेचे बिघडलेले चित्र यामुळे नागरिक त्रस्त होते. विविध माध्यमांतून पोलीस निरीक्षक शाह यांच्यावर आरोप झाल्यानंतर ही बदली केल्याचे बोलले जात आहे.

सध्या नव्याने पदभार स्वीकारणारे पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांच्याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून, त्यांच्यासमोर वाढती गुन्हेगारी, वाहतूक कोंडी, घरफोडी, छेडछाड व फसवणुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांवर लगाम घालण्याचे मोठे आव्हान आहे.

शहरातील कायदा-सुव्यवस्थेला पूर्ववत करण्यासाठी व जनतेचा विश्वास परत मिळवण्यासाठी ही बदली ठरणार का प्रभावी, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.