Bhopal Mantralaya Fire | भोपाळच्या मंत्रालयामध्ये आग; अनेक शासकीय कागदपत्रांची राख | Navarashtra (नवराष्ट्र)

0
22
Bhopal Mantralaya Fire | भोपाळच्या मंत्रालयामध्ये आग; अनेक शासकीय कागदपत्रांची राख | Navarashtra (नवराष्ट्र)


भोपाळच्या मंत्रालयामध्ये आग; अनेक शासकीय कागदपत्रांची राख

भोपाळमध्ये मोठी आगीची घटना घडली आहे. भोपाळच्या मंत्रालयातील इमारतीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झालीत.

भोपाळ : भोपाळमध्ये मोठी आगीची घटना घडली आहे. भोपाळच्या मंत्रालयातील इमारतीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झालीत. मात्र या आगीमध्ये अनेक महत्त्वाची शासकीय कागदपत्रे जळाली आहेत. शासकीय इमारतीमध्ये आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली.

भोपाळच्या थेट मंत्रालयामध्ये आग लागल्यामुळे उपस्थित सर्व लोकांची एकच धावपळ झाली. सदर आग इमारतीच्या पहिल्या, चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक वाहने घटनास्थळी दाखल झालीत. अग्निशमन दलाकडून आगिवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ऑफिसमध्ये असलेली कागदपत्रे, पुठ्ठे आणि लाकडी सामानाने या आगीत मोठा पेट घेतला आहे. त्यामुळे आगीने आणखी रौद्ररुप धारण केल्याचे दिसत आहे.






Source link