
भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. चौथ्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर आहेत.
गुजरातच्या मोरबीमध्ये निर्माणाधीन कॅालेजचा स्लॅब कोसळल्याची घटना शनिवारी सकाळीच उघडकीस आली. या दुर्घटनेत चार जण जखमी झाले आहेत. ही घटना ताजी असतानाच आता मध्य प्रदेशमधून देखील मोठी बातमी समोर येत आहे. भोपाळमधील मंत्रालयाच्या इमारतीला भीषण आग (Bhopal Mantralaya Bulding Fire) लागली आहे. चौथ्या मजल्यावर आग लागली. आग लागताच सगळीकडे एकच खळबळ उडाली. सध्याअग्निशमन दलाला तत्काळ पाचारण करण्यात आलं असून अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी हजर झाल्या आहेत.
हे सुद्धा वाचा
नेमकं काय घडलं
आज सकाळच्या सुमारास ही आगीची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळातच या प्रकरणाची माहिती देण्यात आली, त्यानंतर अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. ही आग कशी लागली याबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आग एवढी भीषण होती की, अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या लोकांना इमारतीतून बाहेर काढण्यात आलं असून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे.