
Bhiwandi Minor Girl Rape News: ठाण्यातील भिवंडी परिसरात धक्कादायक घटना घडली. सावत्र अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी २४ वर्षीय व्यक्तीला अटक केली. गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने तीन जणांनी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याचा बनाव रचला. परंतु, पोलिसांना त्याच्यावर वेगळाच संशय आला. याप्रकरणी पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने मुलीवर अत्याचार केल्याची कबूली दिली.




