
भिवंडी तालुक्यातील राहणाळ येथे पेरणा कॉम्प्लेक्स येथील गोदामाला भीषण आग लागली. गोदामात इलेक्ट्रॉनिक सामान असल्याने आगीचा भडका उडाला. घटनास्थळी अग्निशामक दलाची एक गाडी व पाण्याचा एक टँकरही दाखल झाला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू असून या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले.