Wednesday, September 16, 2026
Homeसाताराकोरेगाव भीमा विजयस्तंभ बचावासाठी न्यायालयीन लढा आणि जनजागृती मोहीम; फलटण तालुक्याची जबाबदारी...

कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचावासाठी न्यायालयीन लढा आणि जनजागृती मोहीम; फलटण तालुक्याची जबाबदारी आयु. हरीश काकडे यांच्यावर

मुंबई – कोरेगाव भीमा विजयस्तंभ विकासासाठी सरकारने अनेक वेळा निधी जाहीर केला असला तरी, विजयस्तंभाच्या अतिक्रमण आणि जागेच्या मालकी हक्काचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विकास काम करता येत नाही. या ऐतिहासिक विजयस्तंभाच्या सन्मानासाठी आणि विकासासाठी प्रथम न्यायालयीन लढा जिंकणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या लढ्याची व्याप्ती वाढवण्यासाठी राज्यभर जनजागृती अभियान राबवले जाणार असून, गाव ते राष्ट्रीय पातळीवर हा लढा समाजाभिमुख व्हावा यासाठी कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांनी फलटण तालुक्याची जबाबदारी सामाजिक कार्यकर्ते आयु. हरीश काकडे यांच्याकडे सोपवली आहे.

आयु. हरीश काकडे हे सुरुवातीपासूनच कोरेगाव भीमा विजयस्तंभ अतिक्रमण न्यायालयीन लढ्यात सक्रिय सहभागी असून, त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम, विविध आंदोलन, न्यायालयीन लढे आणि मोर्च्यांद्वारे दलित अत्याचार, महिला अत्याचार पीडितांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी नगरपालिकेतील दिव्यांगांसाठी ५% निधी सुरू करून एकरकमी ४५ लाखांचा निधी मिळवून दिला असून, त्यांच्या कार्यातून दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांची राज्यभर ओळख आहे. धार्मिक व सामाजिक आंदोलनांमध्येही त्यांचा ठसा उमटलेला आहे. विजयस्तंभ न्यायालयीन लढ्यात आयु. हरीश काकडे तन, मन आणि सर्वस्व लावून जनजागृतीचे कार्य करतील, असा विश्वास कोरेगाव भीमा विजयस्तंभ बचाव समितीने व्यक्त केला आहे.

त्यांच्या पुढील कार्यास ‘साहस टाइम्स’ तर्फे हार्दिक शुभेच्छा.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments