
Bhide Wada Razed by PMC: पुण्यातील भिडे वाडा म्हणून प्रसिद्ध असलेली दोन मजली इमारत पुणे महानगरपालिकेने जमीनदोस्त केली, जिथे मुलींची देशातील पहिली शाळा सुरु झाली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महापालिकेने ही कारवाई केली. सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात सर्व भाडेकरुंच्या याचिका फेटाळत महापालिकेला भिडे वाडा ताब्यात घेण्याचे आदेश दिले. यानंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात रातोरात भिडे वाडा इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या ठिकाणी आता राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले जाईल, अशी माहिती आहे.






