Bharat Ratna Award 2024 | माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, पीव्ही नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान, राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मान! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Bharat Ratna Award 2024 | माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग, पीव्ही नरसिंह राव यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान, राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते सन्मान! | Navarashtra (नवराष्ट्र)


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंग (मरणोत्तर) यांच्यासह चार जणांना भारतरत्न पुरस्कार प्रदान केला.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (President Draupadi Murmu) शनिवारी पाच व्यक्तिंना देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न (Bharat Ratna Award 2024) प्रदान केला. राष्ट्रपतींनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग, कृषी शास्त्रज्ञ एमएस स्वामीनाथन आणि कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न प्रदान केले. हे चारही पुरस्कार मरणोत्तर देण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

दिवंगत माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांचा पुरस्कार त्यांचे पुत्र पीव्ही प्रभाकर राव यांनी स्वीकारला. चौधरी चरणसिंग यांचे नातू जयंत सिंह यांनी दादांचा पुरस्कार स्वीकारला. यासोबतच एमएस स्वामिनाथन यांची मुलगी नित्या रावही पुरस्कार स्वीकारण्यासाठी कार्यक्रमाला पोहोचली होती.





Source link