
Happy Birthday Bharat Jadhav : आपल्या दमदार अभिनयसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते भरत जाधव यांनी आजवर अनेक मनोरंजक चित्रपट दिले आहेत. मराठी रंगभूमीवरही ते प्रचंड सक्रिय आहेत. भरत जाधव यांची अनेक नाटकं इतकी गाजली आहेत की, त्यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी जागा मिळवली आहे. अशाच नाटकांपैकी एक म्हणजे ‘सही रे सही’. आज म्हणजेच १२ डिसेंबर रोजी भरत जाधव यांचा ५१वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या ‘सही रे सही’ या नाटकाचा एक खास किस्सा…








