Bhandara Flood : मुसळदार पावसामुळं भंडाऱ्यात पूरस्थिती, आवळी गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला

0
19
Bhandara Flood : मुसळदार पावसामुळं भंडाऱ्यात पूरस्थिती, आवळी गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला


Bhandara Rain and Flood Update : गेल्या तीन दिवसांपासून कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यानंतर आता पावसाने विदर्भात आपला मोर्चा वळवला आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. परिणामी विदर्भातील अनेक नद्यांना पूर आला असून भंडाऱ्यात तर पूरस्थिती निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीपासून होत असलेल्या पावसाने भंडाऱ्यातील बहुतेक तालुक्यांत ओढ्या-नाल्यांना पूर आला आहे. त्यानंतर आता लाखांदूर तालुक्यातील आवळी या गावाला चारही बाजूंनी पुराच्या पाण्याने घेरलं आहे, त्यामुळं आवळी गावाचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.



Source link