Best Tourism village Dhordo | गुजरातच्या ‘या’ गावाला मिळाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा मान, पंतप्रधान मोदींनी फोटो केला शेअर! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Best Tourism village Dhordo | गुजरातच्या ‘या’ गावाला मिळाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा मान, पंतप्रधान मोदींनी फोटो केला शेअर! | Navarashtra (नवराष्ट्र)


गुजरातच्या ‘या’ गावाला मिळाला सर्वोत्कृष्ट पर्यटन गावाचा मान, पंतप्रधान मोदींनी फोटो केला शेअर!

पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान केवळ भारतीय पर्यटनाची क्षमताच अधोरेखित करत नाही तर कच्छ प्रदेशातील लोकांचे समर्पण देखील अधोरेखित करतो.

संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने ( United Nations World Tourism Organisation) गुरुवारी गुजरातमधील धोर्डो गावाला सर्वोत्तम पर्यटन गाव (Best Tourism village Dhordo) म्हणून घोषित केले. याचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोर्डो गावाचे फोटो शेअर करून आंनद व्यक्त केला.  गावातील समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि नैसर्गिक सौंदर्यावर अधोरेखित करणारे काही फोटो त्यांनी शेयर केले. पंतप्रधान म्हणाले की, हा सन्मान केवळ भारतीय पर्यटनाची क्षमताच अधोरेखित करत नाही तर कच्छ प्रदेशातील लोकांचे समर्पण देखील अधोरेखित करतो.

हे सुद्धा वाचा

त्यांनी ट्विटरवर पोस्ट शेयर करत म्हण्टलं की, मी माझ्या 2009 आणि 2015 मध्ये धोर्डोला दिलेल्या भेटींच्या काही आठवणी शेअर करत आहे. मी तुम्हा सर्वांना तुमच्या धोर्डोच्या मागील भेटींच्या आठवणी सांगण्यासाठी आमंत्रित करतो. यामुळे अधिक लोकांना प्रवास करण्याची प्रेरणा मिळेल.





Source link